Thursday, March 27, 2008

फुलायचं असतं

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं.........

Sunday, March 23, 2008

नातं

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं.

अस नातं गुंफ़ता गुंफ़ता
स्वत:सोबत स्वत:चेच एक नाते
नकळतं गुंफ़ले जात असते...

कितीतरी खोल द-या, उंचच सुळक्यांचे डोंगर
अन काटेरी झुडपांचे रस्ते पार करतांना,
नात्याला धक्का न लागू देण्याची ती असोशी....

जगण्याचे सगळे संदर्भ त्या नात्यात एकवटून यावेत
अन जगता जगता ते नातंच एकाएकी गवसेनासं व्हावं..

रिकाम्या ओंजळीनेच मग
जगण्याचे सगळे धडे भरभरुन द्यावे.....

असं नातं जसं समृध्द करतं.... तसच वाताहातही करतं...

तरीही,

या जगात सर्वात सुंदर काय अस विचारलं तर
मी म्हणेन, माणसाचं माणसासोबत असलेल नातं

Wednesday, March 19, 2008

कुणास ठाऊक?

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील!

आवड

आवडत मला...
सायंकाळी समुद्र किनारी फ़िरायला
ओल्या वाळू वर अलगदपणे
पावलं टाकायला.
खुप मज्जा येते ज्या
वेळी ती ओली वाळू
तळपायांना हळूवार स्पर्श करते.
आवडत मला...
त्याच वाळूवर काही
वेळ बसुन त्या मावळत्या
सुर्याकडे एकटक बघत बसायला.
आवडत मला ...
त्या समद्रात बुडणारया
सुर्याकडे पहात पहात
गेलेले दिवस आठवत बसणे.
आवडत मला...
बुडलेल्या सुर्याला
पाहता पाहता
ऊद्या च्या नविन
किरणांची वाट पाहायला...

राज'नीती

मी मराठी मी मराठी
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?.....
दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...
दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...
ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी अस्तित्वासाठी...
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी...
पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे
मराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवून
मुंबई भार सहन करेल तरी किती?
मुंबईच काय, ते तर शिरलेत आता
मुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या
गुदमरलेल्या जीवासाठी ...
त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी
ही 'राज'नीती ....

मी मराठी

मी मराठी

शिवाजींचा मावळा आहे मी,
बाजीरावांचा चाहता आहे मी,
मराठी शौर्य गाणार्‍या शाहिरीच्या
डफ़ावरची थाप आहे मी...


विठोबाची वीट आहे मी,
तुकयाचे गीत आहे मी,
मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे
तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,

अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,
मराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,
मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की,
मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...

मला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.मराठी माणसाने
जातीपतिना गाडून एकवाटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार
नाही .
हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर
अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
इथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले
पाहिजे.
इथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा.
इतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.
मराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.

Friday, March 07, 2008

एक आयटी इंजिनीयरची कविता...!

एक आयटी इंजिनीयरची कविता...!

मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का..
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड.
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव.
डोळे मिटुन घे.तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर.
इनबॉक्स वर ये.तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग.
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे.
वाचत राहा मेल संपेपर्यंत.
तो संपनार नाहीच.
शेवटी मेल बंद कर.डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस.
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये.
आता दुसऱ्या मेलची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का???.

घड्याळात पाच वाजतील.
तुला निघायची घाई असेल.
तितक्यात एक मेल येईल.
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ.
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण.
तु म्हण सर्व्हर डाऊन होता.
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर..तुही वाच.
तो पुन्हा फॉरवर्ड करेल.
तू तो डीलीट कर.
एखादी कविता वाच.
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल.
तरी पुन्हा मेल येईल.
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची..,
मग तुही तसेच लिही.
मेल मागून मेल येतील.
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील.
शेवटी सगळे डीलीट कर.

मुली मुली मुली मुली

मुली मुली मुली मुली

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून
असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा
खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय
संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.
(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद
त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी......

Tuesday, March 04, 2008

.....जपशील ना?

मोठ्या फणका-याने.....
तुला सोडुन निघाले होते!
पण
थाम्बले, वळले, पाह्यलं, जाणवलं....
माझ्या मनातला एक रेशिम धागा
तुझ्या ठायी गुंतला होता!
तो धागा-
सोडवणं जमेलसं वाटत नाही
तोडणं माझ्या स्वभावात नाही!
पुढे जाणं तर अटळ आहे
तेव्हा आता-
त्या धाग्यासोबत माझं थोडं मन ठेवते
जातांना तुला सांगुन जाते-
"आपल्या वेड्या सखीचं
भाबडं मन जीवापाड जप!....
.....जपशील ना?

आयुष्यात प्रेम करायचय मला...

आयुष्यात प्रेम करायचय मला ........
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...


ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला..............


--
Using Opera's revolutionary e-mail client: http://www.opera.com/mail/

ऐलमा पैलमा गणेश देवा.........

ऐलमा पैलमा गणेश देवा,
माझा नवरा बदलून दे, करीन तुझी सेवा.
जन्मोजन्मी कसल एका जन्मी झाले बो......र
मी नाही गुंडाळायची वडाला आता दोर,
कोणे एकेकाळी कसा फिदा होता माझ्यावर,
ओफिसातून थेट कसा घरी यायचा भरभर,
न चुकता घेऊन येत असे फूल आणि गजरा
व्हेलेंटाईन डे तर रोज व्हायचा साजरा.
ह्यांच्या नजरा ......त्यांच्या नजरा,
लागल्या आमच्या संसारा.
घर ,पाहुणे ,मुलांमध्ये मी झाले दंग,
बघता बघता रोमान्साचा झाला बेरंग,
क्षुल्लक कारणावरून उडू लागलेत खटके,
सासुबाईंचे मधे मध्ये शब्दिक फटके.
ओफिसातून घरी हल्ली रोज येतात लेट,
तुमच्यासाठी कमावतोय ही वरती भेट.
लोळण,पेपर,मित्र पत्ते हाच ह्यांचा रवीवार,
मुलांसंगे बाहेर जायला नाही म्हणे जमणार.
दहा वर्षात देवा माझी झाली अशी दैना
ह्यांनाच धडा शिकवायच आलय माझ्या मना
म्हणून म्हणते हात जोडून गणेश देवा ,
एक्सेंज ओफरचे तेव्हढे मनावर घ्याना.
मीच काय किती जणी करतील तुमची सेवा,
ऐलमा पैलमा गणेश देवा.........

कारण शेवटी मी एक.....

कारण शेवटी मी एक.....
......... आभार - गिरीश आणि कवी ..

आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतात
शाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतात
सध्या काम कमी अन् वेळ भरपूर
कंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करून
काय करणार सध्या बेंच वर आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो
कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो
चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्या
कॉलेज कँटिनच्या कटिंगची सर नाही त्याला
कंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्या
ए.सी कौंफरंस रूम्स मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्या
टीम-मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली
पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली
ODC मध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचे
कोण कुठे काय करतोय लगोलग कळायचे
आजकाल जो- तो प्रोजेक्ट मध्ये बिझी जाले
भुला भटका missed call आता महाग झालाय
फोर्वार्ड्स आणि चैन मेल्स मध्ये खुशालीची मेल शोधतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातो
दीड-दमडीच्या मुव्हीसाठी शे-दीडशे मोजतो
सेलिब्रेशन्स,पार्टीज साठी पिज्जा हुटचा रास्ता गाठतो
वेगी क्रुस्ट, पपोरोनी कसले कसले फ्लेवर्स मागावातो
पण पौकेट मनीसाठवून केलेल्या पार्टीची मजा हयात शोधत आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

बरेच दिवस झाले इथे हैदराबादला येऊन
सुरुवातीला होमसिक वाटले, आता घेतलीये सवय करून
आमच्या पुण्याच्या टपरीची जागा येथे हुसेन सागर ने घतली
बेंगलुर, मैसुर हैदराबादच्या गर्दीत माझी पुणे मात्र हरवली
पुणे पोस्टिंग मिळावे म्हणून प्रयत्न करतो आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहे

रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतो
एकुलता-एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो
"आता कधी येशील?" असे आई रोज विचारते
बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते
करियर आणि आई-बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे
कारण शेवटी मी एक साँफ़्टवेअरप्रोफेशनल आहे

खरच सारे काही गेलेय आता बदलून
एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडून
कधीतरी तो दिवस येईल
ऑफिसमधून थेट मी माझ्या घरी जाईन
पण मला माहितेय हे एक स्वप्न आहे
कारण शेवटी मी एक.....

मी मराठी

मी मराठी मी मराठी
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?.....
दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...
दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...
ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी अस्तित्वासाठी...
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी...
पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे
मराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवून
मुंबई भार सहन करेल तरी किती?
मुंबईच काय, ते तर शिरलेत आता
मुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या
गुदमरलेल्या जीवासाठी ...
जय महाराष्ट्र

शिवा पाहिजे

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे

थॅंक्स

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात .
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात .

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
टॉम अँड जेरी पाहिल पाहिजे .

आंघोळ फ़क्त दहा मिनीटे?
एखाद्या दिवशी तास द्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता आल पाहिजे .

भसाडा का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे ,
वेडेवाकडे अंग हलवत
नाचणंसुद्धा जमलं पाहिजे.

गीतेचा रस्ता योग्यच आहे .
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच" सुद्धा एन्जॉय करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेतसुद्धा फ़िरलं पाहिजे .
'फ़ुलपाखरांच्या' सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

द्यायला कोणी नसलं
म्हणुन काय झालं ?
एक गजरा विकत घ्या
ओंजळभरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या,
एवढ्या सुंदर जगण्यासाठी
नुसतं थॅंक्स तरी म्हणा!

प्रेम करायचं राहुन गेलं!!!

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं!!!