Saturday, June 02, 2007
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
'का जाशी' ते ही 'सांग' म्हणालो नाही.
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही ...
मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का ही नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी'
जा! फिटले सारे पांग!'- म्हणालो नाही
बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय लागला आतून वणवा सारा
पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही...
बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग- म्हणालो नाही...
हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग- म्हणालो नाही...
मुली
'मुलीची जात'
हे शब्द उच्चारवत नाही मला!
मुली कशाही वागल्या
तरीही...
मुली मुलीच असतात!
किती तन्मयतेनं
त्या सजवित राहतात घर!
त्यांच्या नुसत्या असण्याने
बोलू लागतात भिंती
नि डोलू लागते छप्पर...
मुली भरुन टाकतात अंगण
नि वळचणीतले रांजण
मनातल्या स्वप्नांनी-रंगांनी
शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे
कौशल्य असते त्यात.
हा सोस नसतो मुलींचा
तर ध्यास असतो नव्या उर्मींचा!
मुली असतात
उन्हाची कातरछाया
लहरती.. बहरती कापूर काया
त्या सुखाचा मंद प्रकाश
नि मायेचं झुलतं.. धुंद आकाश
त्या विश्वाचा कोवळा हात
जगाची अधाशी तहान
त्या असतात
काळाचे फडफडते
कोरे करकरीत पान...
म्हणून मुलींना
करु द्यावेत हट्ट
नि होऊ द्यावे स्वच्छंदी
हीच तर असते
त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या
निरांजनातील असोशीची नांदी.
- अशोक कोतवाल
Wednesday, April 25, 2007
बोर्नविटा!!!!!
मैने तुझे छेडा
तेरे बाप ने मुझे पीटा
तेरे भाई ने मुझे पीटा
तेरी बहन ने मुझे पीटा
तन की शक्ती
मन की शक्ती
बोर्नविटा!!!!!
मनातले शब्द मनातच राहून गेले...
मनातले शब्द मनातच राहून गेले...
तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे,
पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,
पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,
पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे,
पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,
पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
अस्तित्वाची लढाई
लाल जखमा.. भळ्भळ वाहणार्या
सारा जमाव पाहतो आहे
खुनशीपणाने हसतो आहे
दगडांची अस्त्रं परजतो आहे
काळजाचे ताट माझ्या फोडतो आहे
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
मारा.. ठोका.. फेकून द्या साल्याला..
माझा रस्ता काटला याने
श्रीमंतीचा घोट घेतला याने
झोपडीचा प्रासाद केला याने
पोटशूळीचा अंगार जाळतो आहे
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
बस.. याचा खेळ खलास करायचा
सशाचा ससाणा होतोच कसा?
डोळ्यात मिजास याच्या येतोच कसा?
सगळ्यांना किडेच समजतो जसा
मी पुढारलो तर उद्रेक का भडकतो आहे?
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
अरे जा.. कोण घाबरतो तुम्हाला?
तुमच्या समोर उठणार मी
पचविणार सगळे प्रहार मी
संपलो तरी उरणार मी
अस्तित्वाची लढाई मी लढतो आहे
स्वयंभू प्रकाशाचा भास मला होतो आहे
- शशांक दळवी
आठवण
आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...
पण तरिही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....
यात काही पाप नाही
सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
मंगेश पाडगांवकर
Tuesday, April 24, 2007
एक मुलगी
माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत ना
Monday, April 23, 2007
एक कळी
एक कळी हास्याची
ओठांवरी असावी
विनवेल जग हे सारे
परी माझ्यास्तव उमलावी
नजरेला नजर भिडावी
ह्रदयाचे बंध तुटावे
शब्दांना कळले नाही
ते डोळ्यांनी बोलावे
मी आभारी आहे तुझा
मी आभारी आहे तुझा..........
मी आभारी आहे तुझा
माझ्या जीवनात येण्याबद्दल
आणि येउन पुन्हा
एकट्याला सोडून गेल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा
मला स्वप्नं दाखवल्याबद्दल
स्वप्नातुन परत
वास्तवात आणल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा
दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल
आणि पुढचा प्रवास
अर्धात सोडून गेल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा
जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल
जाता जाता याच होडीला
वादळात सोडून गेल्याबद्दल
बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीस
दुस-या कुणीही नसती
इतकी दु:खं पचवली
मी आभारी आहे तुझा
याही गोष्टीसाठी........
प्रीत आशी माझी
पांघरून तुझ्या प्रेमाची शाल
डुबुंन जातो प्रेम सागरात
रंगवून स्वप्न माझ्या प्रेमाचे
गवसत बसतो मी तुला त्यात
लवकर दे तुझ्या प्रेमाची साथ
वरूण घे माझ्या प्रेमाला देऊनी हात
प्रीत आशी माझी जगाहुन वेगळी
तिला तू कधीतरी समजवून घे
सांग
सांग आता तरी सांग,जे सांगायचे होते
सांग मी मला कूठे टांगायचे होते.
सोडीली मी वाट माझी,तुझीच वाट जाहलो
सांग कोणत्या मुक्कामी,थांवायचे होते.
पेरले मी श्वास माझे,पेरले मलाही
सांग कोणत्या गंधासवे,उगवायचे होते.
सांडले रे क्षण सारे,आज सारे विस्कटले
सांग कोणत्या जिंदगीला,बांधायचे होते.
कोमेजलेल्या मनावर
कोमेजलेल्या मनावर
थंडगार झुळुक
सदाबहार गीताची
निसटती चुणुक
आशयघन नजरेत
तेच अबोल कौतुक
सुखावलेल्या जीवाची
अवस्था होई भावुक
हरपलेल्या भानाला
वास्तवाचा चाबुक
रंगीबेरंगी स्वप्नांचा
अंत नसे ठाऊक
हळूच स्पर्शून गेला.
तू दिलेला मोगऱ्याचा गजरा
खूप काही मला देऊन गेला
त्याने स्वप्नांचा ताटवा पसरून
प्रीतीचा फुलोरा फुलविला
त्याच्या मद मस्त गंधाने
माझा रोम रोम खुलविला
तुझा हा गजरा माझ्या भावनेला
हळूच स्पर्शून गेला.
Friday, April 20, 2007
माझा स्वभाव नाही
अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही
येथे पिसून माझे काळीज बॅसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही
हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही
त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही
जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही
सुरेश भट
बहुतेक
अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा...
काठावरी उतरली, स्वप्ने, तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा...
ज़खमा कशा? सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने ,तो मोगरा असावा...
माथ्यावरी नभाचे ,ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या?हा पिंजरा असावा...
सुरेश भट
निर्व्याज मैत्र हरवलं होतं
सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं
घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं
गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं
पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं
कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं ….
मी आणि ती
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती
खरं सांगू
खरं सांगू, मला आवडतं!!!!
खरं सांगू, मला आवडतं!!
तुझं असणं,
तुझं हसणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
पावलात अडखळणं,
दगडाला लागलं म्हणुन अश्रु गाळणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
एकांती किनारी बसणं,
स्वप्नांच्या होड्या करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
फुलपाखरांशी गप्पा मारणं,
त्यांना आपल्यातीलच समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
तुझं लटकं रागावणं,
चिडले आहे भासवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
हिशोबात हरवणं,
बोटांवर बेरीज करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
अंधाराला घाबरणं,
चंद्राला पापण्यांत लपवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
सिनेमात सगळं विसरणं,
माझ्या खांद्याला रुमाल समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
तुझ्यासमोर मनाचा आरसा होणं,
शब्दांचा भार हलका होणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
आता तुझं नसणं,
मग अश्रुंना गोंजारणं,
खरं सांगू, मला जड ज़ातंय!!!!
मी
अश्रूंत मी, हास्यात मी, राणी कधी, दास्यात मी,
वेदांत मी, सिद्धांत मी, विश्वरुपी , ब्रम्हांड मी,
दैन्य मी, चैतन्य मी, सत्य मी, आभास मी,
पूजा कधी, निर्माल्य मी, धन्य मी, मांगल्य मी
वास्तवाशी झुंजणारी, असते कधी स्वप्नांत मी
.
माझ्याच शॊधात मी.., माझ्याच शॊधात मी...
कधी मी हसत असते,
कधी मी रडत असते,
नात्याच्या या गुन्त्यातून,
सुटता सुटता अडकत असते मी !