Saturday, November 18, 2006

पालक पराठा



वाढणी: २-३

पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे

पाककृतीचे जिन्नस



  • एक जुडी पालक

  • छोटा कांदा

  • लसूण पाकळ्या-२ किंवा ३

  • धणे-जीरे पुड २ चमचे

  • चवीनुसार हिरवी मिर्ची , मिठ

  • हिंग,ओवा- अर्धा चमचा

  • अद्र्क

  • ३ पराठ्याला पुरेल गव्हाचे पीठ(पालक टाकल्या मुळे ४ होतील)

  • पराठे भाजण्यासाठी तेल किंवा तुप

  • पाणी- अर्धा कप


क्रमवार मार्गदर्शन: पालक धुवुन घ्यावा,अर्धा कांदा चिरुन घ्यावा, उकळत्या पाण्यात पालक-कांदा ३-४ मिनीट ठेवावा, पाणी गाळुन पालक-कांदा वेगळा करावा. यामुळे पालक कच्चा राहणार नाही व कांद्याचा उग्रपणा जाईल. मिक्सर मधुन पालक,कांदा,अद्रक,लसूण,हिरवी मिर्ची,धणे-जीरे पुड, हिंग,ओवा,मीठ,पाणी घालुन बारिक पेस्ट बनवावी. हि पेस्ट गव्हाच्या पीठात मिसळुन कणिक मळावी. हि कणिक अर्थातच हिरवी होईल. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे पहिल्या स्टेप मध्ये कणकेचा एक छोटा गोळा गोलाकार लाटावे,त्यावर तुप लावुन,पीठ भुरकावे, व नंबर २ च्या चित्राप्रमाणे चाकुने एक कट देवुन कोन बनवावा(नंबर ३). हा कोन दाबुन चपटा बनवल्यावर(नंबर ४ सारखा दिसेल) गोलाकार परोठा लाटुन तव्यावर तुप लावुन भाजावा. यामुळे पराठ्यांना खुप (गोलाकार)पदर सुटतात.



चित्र:



माहितीचा स्रोत: माझी ताई सौ. अलका


अधिक टीपा: याप्रकारे साधे किंवा, मेथीचे किंवा कोणतेही पराठे छान होतात.



No comments: