छातीत निर्भय श्वास दे,
साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्या संकटांना
ठेचणारे पाय दे ।।
ध्येय दे उत्तुंग मंगल
अढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू दे
हृदयातून गंगेपरी ।।
दीनदुबळ्या रक्षणा रे,
शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी
रुधिरांत धरती न्हाऊ दे।।
निष्पाप जे ते रुप तुझे
उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पन्थ याच्या
तोड आता श्रुंखला ।।
नवीन गगने, नवीन दिनकर,
नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्या
न्याय नीती नांदू दे ।।
छातीत निर्भय श्वास दे...
Friday, November 17, 2006
छातीत निर्भय श्वास दे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment