मैने तुझे छेडा
तेरे बाप ने मुझे पीटा
तेरे भाई ने मुझे पीटा
तेरी बहन ने मुझे पीटा
तन की शक्ती
मन की शक्ती
बोर्नविटा!!!!!
Wednesday, April 25, 2007
बोर्नविटा!!!!!
मनातले शब्द मनातच राहून गेले...
मनातले शब्द मनातच राहून गेले...
तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे,
पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,
पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,
पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे,
पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,
पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
अस्तित्वाची लढाई
लाल जखमा.. भळ्भळ वाहणार्या
सारा जमाव पाहतो आहे
खुनशीपणाने हसतो आहे
दगडांची अस्त्रं परजतो आहे
काळजाचे ताट माझ्या फोडतो आहे
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
मारा.. ठोका.. फेकून द्या साल्याला..
माझा रस्ता काटला याने
श्रीमंतीचा घोट घेतला याने
झोपडीचा प्रासाद केला याने
पोटशूळीचा अंगार जाळतो आहे
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
बस.. याचा खेळ खलास करायचा
सशाचा ससाणा होतोच कसा?
डोळ्यात मिजास याच्या येतोच कसा?
सगळ्यांना किडेच समजतो जसा
मी पुढारलो तर उद्रेक का भडकतो आहे?
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
अरे जा.. कोण घाबरतो तुम्हाला?
तुमच्या समोर उठणार मी
पचविणार सगळे प्रहार मी
संपलो तरी उरणार मी
अस्तित्वाची लढाई मी लढतो आहे
स्वयंभू प्रकाशाचा भास मला होतो आहे
- शशांक दळवी
आठवण
आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...
पण तरिही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....
यात काही पाप नाही
सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
मंगेश पाडगांवकर
Tuesday, April 24, 2007
एक मुलगी
माझ्याशी बोलायची,
रोज गोड हसायची,
कधी कधी माझी
वाट बघत थांबायची....
दुसरी एकही मुलगी
माझ्याशी कधी बोलायची नाही,
ही पोरगी मात्र
माझी पाठ कधी सोडायची नाही....
तिच्या आयुष्यातल्या गमती
ती रोज मला सांगायची,
मी नवी लिहिलेली कविता
सारखी वाचायला मागायची....
एकदा मला म्हणाली
"तू माझ्यावर कध्धीच कविता करत नाही !"
तेव्हा मला समजलं....
तिला माझी एकही कविता कळत ना
Monday, April 23, 2007
एक कळी
एक कळी हास्याची
ओठांवरी असावी
विनवेल जग हे सारे
परी माझ्यास्तव उमलावी
नजरेला नजर भिडावी
ह्रदयाचे बंध तुटावे
शब्दांना कळले नाही
ते डोळ्यांनी बोलावे
मी आभारी आहे तुझा
मी आभारी आहे तुझा..........
मी आभारी आहे तुझा
माझ्या जीवनात येण्याबद्दल
आणि येउन पुन्हा
एकट्याला सोडून गेल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा
मला स्वप्नं दाखवल्याबद्दल
स्वप्नातुन परत
वास्तवात आणल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा
दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल
आणि पुढचा प्रवास
अर्धात सोडून गेल्याबद्दल
मी आभारी आहे तुझा
जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल
जाता जाता याच होडीला
वादळात सोडून गेल्याबद्दल
बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीस
दुस-या कुणीही नसती
इतकी दु:खं पचवली
मी आभारी आहे तुझा
याही गोष्टीसाठी........
प्रीत आशी माझी
पांघरून तुझ्या प्रेमाची शाल
डुबुंन जातो प्रेम सागरात
रंगवून स्वप्न माझ्या प्रेमाचे
गवसत बसतो मी तुला त्यात
लवकर दे तुझ्या प्रेमाची साथ
वरूण घे माझ्या प्रेमाला देऊनी हात
प्रीत आशी माझी जगाहुन वेगळी
तिला तू कधीतरी समजवून घे
सांग
सांग आता तरी सांग,जे सांगायचे होते
सांग मी मला कूठे टांगायचे होते.
सोडीली मी वाट माझी,तुझीच वाट जाहलो
सांग कोणत्या मुक्कामी,थांवायचे होते.
पेरले मी श्वास माझे,पेरले मलाही
सांग कोणत्या गंधासवे,उगवायचे होते.
सांडले रे क्षण सारे,आज सारे विस्कटले
सांग कोणत्या जिंदगीला,बांधायचे होते.
कोमेजलेल्या मनावर
कोमेजलेल्या मनावर
थंडगार झुळुक
सदाबहार गीताची
निसटती चुणुक
आशयघन नजरेत
तेच अबोल कौतुक
सुखावलेल्या जीवाची
अवस्था होई भावुक
हरपलेल्या भानाला
वास्तवाचा चाबुक
रंगीबेरंगी स्वप्नांचा
अंत नसे ठाऊक
हळूच स्पर्शून गेला.
तू दिलेला मोगऱ्याचा गजरा
खूप काही मला देऊन गेला
त्याने स्वप्नांचा ताटवा पसरून
प्रीतीचा फुलोरा फुलविला
त्याच्या मद मस्त गंधाने
माझा रोम रोम खुलविला
तुझा हा गजरा माझ्या भावनेला
हळूच स्पर्शून गेला.
Friday, April 20, 2007
माझा स्वभाव नाही
अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही
येथे पिसून माझे काळीज बॅसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही
हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही
त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही
जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही
सुरेश भट
बहुतेक
अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा...
काठावरी उतरली, स्वप्ने, तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा...
ज़खमा कशा? सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने ,तो मोगरा असावा...
माथ्यावरी नभाचे ,ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या?हा पिंजरा असावा...
सुरेश भट
निर्व्याज मैत्र हरवलं होतं
सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं
घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं
गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं
पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं
कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं ….
मी आणि ती
मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती
मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती
तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती
तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती
तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.
नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.
तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती
तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती
आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.
मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती
खरं सांगू
खरं सांगू, मला आवडतं!!!!
खरं सांगू, मला आवडतं!!
तुझं असणं,
तुझं हसणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
पावलात अडखळणं,
दगडाला लागलं म्हणुन अश्रु गाळणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
एकांती किनारी बसणं,
स्वप्नांच्या होड्या करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
फुलपाखरांशी गप्पा मारणं,
त्यांना आपल्यातीलच समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
तुझं लटकं रागावणं,
चिडले आहे भासवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
हिशोबात हरवणं,
बोटांवर बेरीज करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
अंधाराला घाबरणं,
चंद्राला पापण्यांत लपवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
सिनेमात सगळं विसरणं,
माझ्या खांद्याला रुमाल समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
तुझ्यासमोर मनाचा आरसा होणं,
शब्दांचा भार हलका होणं,
खरं सांगू, मला आवडतं!!
आता तुझं नसणं,
मग अश्रुंना गोंजारणं,
खरं सांगू, मला जड ज़ातंय!!!!
मी
अश्रूंत मी, हास्यात मी, राणी कधी, दास्यात मी,
वेदांत मी, सिद्धांत मी, विश्वरुपी , ब्रम्हांड मी,
दैन्य मी, चैतन्य मी, सत्य मी, आभास मी,
पूजा कधी, निर्माल्य मी, धन्य मी, मांगल्य मी
वास्तवाशी झुंजणारी, असते कधी स्वप्नांत मी
.
माझ्याच शॊधात मी.., माझ्याच शॊधात मी...
कधी मी हसत असते,
कधी मी रडत असते,
नात्याच्या या गुन्त्यातून,
सुटता सुटता अडकत असते मी !
अशी आहेस तु..
अशी आहेस तू...
सप्तसुरांची उधळण करीत...
सुरांगणा घेवूनी आली..
चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही..
अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली...
हसणं तुझं आहे कीती अवखळ..
गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ..
तुझं वागण आहे किती सरळ..
जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ...
नयन तुझे किती आहे प्रेमळ..
एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ..
अशी आहेस तु जशी तळ्य़ात..
लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ...
तुझ्या मधुर वाणीचे
करावे तितके कौतुक कमीच
हळुवार पुटपुटलीस जरी..
त्याला लाभलीये मधाची गोडी भारी...
मनं तुझं आहे खुप उदार
देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार...
तुझ्या या चांगुलपणाचा..
होतो सगळीकडे जय जयकार..
गर्वाला तुझ्या दुनियेत ..
काडीमात्र स्थान नाही...
प्रेमाचं रान मात्र
कुठेही रिकामं नाही...
अशी आहेस तु..
सुखाचे करतेस दान भरभरुन
अन दु:खाचे डोंगर मात्र
सहन करतेस स्वत:हून...
मान्य आहे मला..
मान्य आहे मला..
की आपले मार्ग आता वेगळे झाले आहेत
पण तरी..
कधी तरी आपण भेटलोच चुकून, तर मला ओळखशील?
मान्य आहे मला..
की आता तू तुझीच फारशी उरली नाहीस
पण तरी..
कोण्या एका धुंद संध्याकाळी माझ्याबरोबर येशील?
मान्य आहे मला..
की तुझ्या ह्रदयावरचा माझा हक्क केव्हांच संपलाय
पण तरी..
कधी तरी कातरवेळी माझी आठवण काढशील?
मान्य आहे मला..
की तुझे ह्सणेच काय पण अश्रूसुद्धा झेलणारा कोणीतरी आहे
पण तरी..
तुझे एखादे हसणे, एखादेच लाजणे माझ्यासाठी ठेवशील?
मान्य आहे मला..
की कशाचाही सामना करायला तू आता खंबीर आहेस
पण तरी..
केव्हा तरी माझ्या संकटकाळी तुझा मैत्रीचा ओला हात मला देशील
नाव बुडण्याआधी
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.
जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे
आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे
नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, "आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, "दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !"
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
-- मंगेश पाडगावकर
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे ;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे .
मी चालतो अखंड चालायचे म्हणून ;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे .
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे ;
हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे .
मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा ;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे .
चुकली दिशा तरीही आकश एक आहे ,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे .
आशा तशी निराशा , हे श्रेय सावधांचे ;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..
- विंदा करंदीकर
Thursday, April 19, 2007
मी उभा
मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे
स्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडे
वाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारं
आज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.
पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडे
ता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडे
तु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातली
आता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.
ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढे
उधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडे
आठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतं
आज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे....
Wednesday, April 18, 2007
प्रेम....
शब्दांनी सांगायचं नसतं प्रेम....
ते डोळ्यांनी साधायचं असतं,
आपलं कुणी झालं नाही तरी..
आपण कुणाचतरी व्हायचं असतं....
खरचं प्रेमाचा अर्थ इतका व्यापक आहे?
प्रकाशासाठी स्वतः जळणारा तो दिपक आहे..
कोवळ्या इंद्रधनूसारखी मनाचा ठाव घेणारी,
प्रेमाची ही कल्पनाचं किती कल्पक आहे....
अर्थहीन जीवनाला नवा अर्थ म्हणजे प्रेम,
तहानलेल्या भूमीला पावसाचा स्पर्श म्हणजे प्रेम..
अमावस्येच्या अंधाराची समिक्षा घेत,
निखळ चंद्राची प्रतिक्षा म्हणजे प्रेम....
म्हणूनच............
जीवनात हवा असतो कुनाचातरी सहवास,
गर्द माळरानातल्या एकट्या गुलाबाची आस...
विरहाचे दुःख डोळ्यात लपवूनही,
भिजलेले डोळे करतात मन उदास...........!
ते दिवस...
आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं
अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो
Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो
Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत
आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती
चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो
खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............
तुला हाक मारायला जमेल...?
मनाशी ठरवून निघालेलो मी
तुझ्या हदयाशी कधी पोहचलोच नाही
तुला आयुष्य समजणारा मी
तुझ्या आयुष्याचा हिस्सा कधी झालोच नाही
आयुष्य जगायचं होतं तुझ्यासोबत
क्षितिजापर्यंत जायचं होतं तुझ्यासोबत
पण तु धरण्यापूर्वीच हात सोडलास..
स्वतःच घरटं बांधायला निघालीस
माझा मात्र स्वप्नांचा मनोरा मोडलास
एकटाच निघालोय त्या वाटेवर
जिथं तुझ्यासोबत चालायचं होतं
कुठे पोहचेन ठाऊक नाही
हेही विसरलोय की कुठे जायचं होतं
तु हाक मारलीस
तर कदाचित परत फिरायला जमेल
पण प्रश्न हा उरतो की
तुला हाक मारायला जमेल...?
मैत्रिण माझी
मैत्रिण माझी हट्टी गं उन्हाळ्याची सुट्टी गं
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणिक बट्टी गं !
मैत्रिण रुमझुमती पोर मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण मैत्रिण कानी डूल मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल !
मैत्रिण मांजा काचेचा हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण बदामाचे गूढ मैत्रिण
मैत्रिण माझी अशी दिसते जणू झाडावर कळी फुलते
ओल्या ओठी हिरमुसते वेड्या डोळ्यांनी हसते
मैत्रिण माझी फुलगंधी मैत्रिण माझी स्वच्छंदी
करते जवळिक अपरंपार तरीही नेहमी स्पर्शापार
मैत्रिण सारे बोलावे मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे
मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते-
पाण्याला का चव असते अन् मैत्रिणीस का वय असते !
मैत्रिण थोडे बोलू थांब बघ प्रश्नांची लागे रांग
दु:ख असे का मज मिळते तुझ्याचपाशी जे खुलते !
मैत्रिण माझी स्वच्छ दुपार मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ !
♥ Valentine Day - ती आणी तो ♥
एकदा एका गावात
एक आधंळा होता मुलगा
प्रेयसीच्या प्रेमामध्ये तो
रमला होता चांगलाच
मित्रांमध्ये तो कमी रमायचा
सर्वांचा तो राग करायचा
धिडकारुन सर्व जगाला मग
फ़क्त प्रेयसीलाच जवळ करायचा
तो नेहमी म्हनायचा तिला
जर दिसत असते डोळ्याने मला
तर लग्नाचा हा हार
घातला असता फ़क्त तुलाच
ती बिचारी लाजेनं चुर व्हायची
डोके ठेवुन त्याच्या छातीवर
देवाजवळ प्रार्थना करायची
आणी काळजी मग डोळ्याची करायची
मग एके दिवशी चमत्कार झाला
न बघनारा तो आता बघु लागला
कुनीतरी डोळे दान केल्या मुळे
स्वत:च्या डोळ्यातच स्वत:ला हरवु लागला.
पन जेव्हा त्याने तिला बघितले
त्याच्या मनातले विचार बदलले
कारण तिला सुद्धा द्रुष्टी नव्हती
त्याच्या सारखी ती सुद्धा लाचार होती
पन त्याला दिसु लागल्याची खुशी तिला होती
देवाचे ती उपकार मानत होती
त्याच्या सुख संसाराच्या स्वप्नात
कित्येकदा स्वत:लाच ती हरवत होती.
मग तिने त्याला विचारले
आता तु माझ्याशी लग्न करशील ?
तुझ्या हाताने माझ्या गळ्यात
लग्नाची ती माळ...
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
विझलेल्या दिव्यांना उजळायला हवे
नाही आठवले शब्द तरी गीत गायला हवे
नसेल जरी खुष तरी हसायला हवे
नको समजूस तुझ्याशीवाय सुखी आहे मी
जगासाठी पण खुष दिसायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
पुन्हा घेऊन शपत खोटी
तू भेटीस आली नाहीसच
मजबुरी असेल तुझीही काही
खोटेच मनाला समजवायला हवे
तरफडत असशील तू ही भेटीसाठी
स्वत:लाच बजवायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
तुटलेल्या स्वप्नांना कुरव ळायला हवे
नाही जमत तुझ्याशीवाय तरी जगायला हवे
नसेल जरी सुखी तरी हसायला हवे
नाही भेटलीस सत्यात तु
स्वप्नात तरी तु यायलाच हवे
वाग कशीही तु तरी पण
आपलीच तुला मानायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
Monday, April 09, 2007
मैत्री
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात
मौन
मौन असत कधी सूचक
कधी ते खूपच भेदक
मौन असत कधी समर्पक
तर कधी ते व्यर्थ निरर्थक
मौन म्हणजे कधी संभ्रम
तर कधी नूसताच विभ्रम
मौन कधी तृप्ती-शांती-समाधान
तर कधी भाव-कल्लोळाचे प्रमाण
मौन कधी फ़ार केविलवाणे
कधी कधी ते लाजिरवाणे
मौन असते कधी समर्पण
कधी ते अहंकार-प्रदर्शन
मौनाचे निघती अर्थ अनेक
मौनापेक्षा बोलणे श्रेष्ठ
काही..........
काही..........
काही धुन्दीत जगतात,
काहि मस्तीत जगतात,
काही वेडेपणाने जगतात,
काही अतिशाहाणे होतात,
काहीना दूसर्यान्च्या दूःखात मिळतो आनद,
काहीना दिसतो स्वताचा स्वानद,
काहीचा स्वार्थ पर्वताहुन मोठा,
काहीना जग म्हणते खो्टा,
काही मात्र,
अशा सगळ्याना पदरात घेउन चालतात,
म्हणूनच अशाना लोक देव मानतात
जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
विश्वास ठेव
इतका वाईट नाही मी; जित्का तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस
तडजोड केली नाही जीवनाशी; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले
हारलो कैकदा झुंजीत; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो; तूच पाठीवर हात ठेवलेस
कसे जगलो आपण, किती सांगू, किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली;नाही बोलवत. नको ती मोजदाद.
अशी उदास, आकुल, डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे; अधिक शरमिंदा करू नको
आयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव.
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.