Friday, April 20, 2007

मान्य आहे मला..


मान्य आहे मला..
की आपले मार्ग आता वेगळे झाले आहेत
पण तरी..
कधी तरी आपण भेटलोच चुकून, तर मला ओळखशील?
मान्य आहे मला..
की आता तू तुझीच फारशी उरली नाहीस
पण तरी..
कोण्या एका धुंद संध्याकाळी माझ्याबरोबर येशील?
मान्य आहे मला..
की तुझ्या ह्रदयावरचा माझा हक्क केव्हांच संपलाय
पण तरी..
कधी तरी कातरवेळी माझी आठवण काढशील?
मान्य आहे मला..
की तुझे ह्सणेच काय पण अश्रूसुद्धा झेलणारा कोणीतरी आहे
पण तरी..
तुझे एखादे हसणे, एखादेच लाजणे माझ्यासाठी ठेवशील?
मान्य आहे मला..
की कशाचाही सामना करायला तू आता खंबीर आहेस
पण तरी..
केव्हा तरी माझ्या संकटकाळी तुझा मैत्रीचा ओला हात मला देशील


No comments: