मनाशी ठरवून निघालेलो मी
तुझ्या हदयाशी कधी पोहचलोच नाही
तुला आयुष्य समजणारा मी
तुझ्या आयुष्याचा हिस्सा कधी झालोच नाही
आयुष्य जगायचं होतं तुझ्यासोबत
क्षितिजापर्यंत जायचं होतं तुझ्यासोबत
पण तु धरण्यापूर्वीच हात सोडलास..
स्वतःच घरटं बांधायला निघालीस
माझा मात्र स्वप्नांचा मनोरा मोडलास
एकटाच निघालोय त्या वाटेवर
जिथं तुझ्यासोबत चालायचं होतं
कुठे पोहचेन ठाऊक नाही
हेही विसरलोय की कुठे जायचं होतं
तु हाक मारलीस
तर कदाचित परत फिरायला जमेल
पण प्रश्न हा उरतो की
तुला हाक मारायला जमेल...?
No comments:
Post a Comment