Thursday, May 17, 2007

अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
विझलेल्या दिव्यांना उजळायला हवे
नाही आठवले शब्द तरी गीत गायला हवे
नसेल जरी खुष तरी हसायला हवे
नको समजूस तुझ्याशीवाय सुखी आहे मी
जगासाठी पण खुष दिसायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

पुन्हा घेऊन शपत खोटी
तू भेटीस आली नाहीसच
मजबुरी असेल तुझीही काही
खोटेच मनाला समजवायला हवे
तरफडत असशील तू ही भेटीसाठी
स्वत:लाच बजवायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

तुटलेल्या स्वप्नांना कुरव ळायला हवे
नाही जमत तुझ्याशीवाय तरी जगायला हवे
नसेल जरी सुखी तरी हसायला हवे
नाही भेटलीस सत्यात तु
स्वप्नात तरी तु यायलाच हवे
वाग कशीही तु तरी पण
आपलीच तुला मानायला हवे
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे

शब्द

शब्द हसणारे,शब्द हसविणारे
शब्द रडणारे,शब्द रडविणारे

कधी मधाळ,तर कधी रसाळ
वेगवेगळ्या तर्हेचे,वेगवेगळ्या स्वभावाचे
कधी सागराप्रमाणे उसळ्णारे
तर् कधी झरयाप्रमणे खळखळणारे

शब्द,कधी भांडतत,कधी कुजबुजतात
कधी रुसतात,कधी उमलतात
आणि कधीतरी फक्त डोळ्यातूनच कळतात

भावनेच्या पोटी जन्म घेउन
तिचे अस्तीत्व दाखवतात
आणि कधी कधी मात्र शब्दच
निशब्द होतात........

अद्यापही सुर्याला माझा सराव नाही

अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही

येथे पिसून माझे काळीज बॅसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

सुरेश भट

मी पुन्हां घराकडे...

मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे
स्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडे
वाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारं
आज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.

पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडे
ता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडे
तु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातली
आता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.

ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढे
उधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडे
आठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतं
आज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे....

निर्व्याज मैत्र हरवलं होतं

सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं

घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं

गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं

पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं


कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं ….

मी आहे हा असा आहे

मी आहे हा असा आहे,
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

अगदी एखाद्या कवीतेसारखा,
आवडली तर ऐका नहितर नीघून जा...

कुणालही सांगणार नाही,जबरद्स्ती तर मुळीच नाही,
समजले पटले तर करा नाहीतर विसरून जा...

तुम्ही जगताय ते योग्य अन् मझ जगण अयोग्य,
जरा असही जगून बघा निश्फळ वाटल तर नावं ठेवा...

तुमच्या आध्यात ना मध्यात ना मझा कुणाला त्रास,
कशाला उगीच वैतागताय कशाला उगीच सन्ताप्ताय...

करावस वाटलं तर एकच् करा
मी जगतोय तस मला जगू द्या...
का नवं ठेवता उगाच
मी करतोय ते मला करु द्या...
म्हणूनच म्हणतो..

मी आहे हा असा आहे,

मराठी मुलगा

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !!

पुन्हा एकदा....

पुन्हा एकदा....
(ह्या कवीतेतुन कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही तुमचे ह्या बाबतीतले विचार प्लिज मला रिप्लाय करा.)

आजकालचे राजकारणी साले असेच खेळ खेळतात,
दुसरयाच्या खांद्यावर बंदुक ठेवुन आपल्यावरच वार करतात,
गरीबांच्या जिवावरच ते निवडणुका लढवतात,
निवडुन आल्यावर मात्र आपल्यावरच पलटतात.

निवडुन यायच्या आधी त्यांना मायबाप बोलतात,
निवडुन आल्यावर त्यांच्याच जिवावरच उठतात,
वेगवेगळी नाटके करुन पैसा फक्त लाटतात ,
समाजसेवेचे व्रत घेऊन पैसा फक्त खातात,
समोर आल्यावर पैसा जनतेला विसरतात.

वेगवेगळ्या नावाने अनेक धंदे करतात,
पकडले गेल्यानंतर फक्त हॉस्पीटलचा रस्ता धरतात,
पकडायच्या आधी जे हट्टे खट्टे असतात,
त्यानंतर आजारीपणाच्या नावाखाली जामीनीवर सुटतात.

चारा ,धान्य अगदी शवपेट्यांचे घोटाळे करतात,
सगळा माल पचवुन मग सुखाची ढेकरही देतात,
आपण मोकाट सुटुन मग निरपराधांना त्यामध्ये फसवतात,
स्वतःहा एसी गाडीत बसुन ते फक्त इंटरव्यु देतात.

सरावलेले चोर साले ते मग चौकशीचे आदेश देतात,
आता अजुन काय बाकी ह्याचाच विचार करतात,
प्रत्येक महीन्याला काहीतरी नवीन बातमी पसरवतात,
मोर्चे काढयला लावुन जनतेची दिशाभुल सहज करतात.

मागेपुढे न पाहाता पोलीसांना लाठीचार्जचा आदेश देतात,
नंतर विचारपुस करुन जखमींची सहानभुतीही मिळवतात,
जनतेच्या डोळ्यांत किती सहजतेने धुळ फेकतात,
हे साले भामटे स्वतःला राजकारणी म्हणवतात.

विकासाच्या नावाखाली सगळे मते मागतात,
आपल्या घराचा विकास करुन देश विकायला लावतात,
कर्जे घेऊन भरमसाठ ति तशीच ठेवतात,
शेतकरयांना पँकेजेचे म्रुगजळ दाखवत राहातात.

निवडणुकीच्या वेळी तर मोठा चमत्कारच करतात,
जिंकुन आलो तर हे करीन ते करीन असे सांगतात,
जिंकेले तर सारे सहजपणे विसरुन जातात,
हरले तर विरोधी पार्टीचा डाव घोशीत करतात.

नागरीकांवर अघोषीत सम्राटशाही करतात,
भारत आहे प्रजासत्ताक ह्याचे सर्वत्र गुणगान करतात,
पकडुन ठेवलेल्या आतंकवाद्यांची देखभाल करतात,
आणी मग आतंकवादी हल्याची निंदा करतात.

गेंड्याची कातडी आपली फार जपून ठेवतात,
आणी मग सफेद कपडे घालुन वर समाजामध्ये वावरतात,
आपल्या देशाचे नेते असे गुणी असतात,
पापे करतात अनेक आणी गंगास्नान करतात,
तेच गंगेचे पात्र साफ करण्यासाठी परत टेंडर मागवतात,
का झाली अशुध्द ह्याचा मग विचार करत बसतात.

आता खरी वेळ आलीय जनतेने आवाज उठवण्याची,
ह्या समाजाच्या किडींना दुर फेकुन देण्याची,
आठवण करा त्या स्वातंत्र लढ्याची,
अनेकांनी डेशासाठी केलेल्या प्राणार्पणाची,
चला सर्व मिळुन सुरु करु तयारी परत त्या लढ्याची,
पुरे झाली तानाशाही ह्या भारतीय गेंड्यांची,
साथ जर असेल ह्याला आपणां सर्वांची,
होईलही भारतात नांदी पुन्हा एकदा शांतीची.

आठवते तुला ती पहीली भेट

आठवते तुला ती पहीली भेट
माझ्या सारखंचं तुझंही झालं होतं
नेमकं काय बोलायचं
एक अनामिक ओझंही आलं होतं

आठवते तुला ती पहीली भेट
तुझ्या डोळ्यात रहस्य दडलेलं
सात जन्माचं नातं
मी पहील्या नजरेतचं अनूभवलेलं

आठवते तुला ती पहीली भेट
किती गोडवा दाटलेला
दिवस तो अमेचा होता
तरी पाडवा वाटलेला

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांच्या चांदण्याने भरलेली
एका चंद्राने अलगद एका
चांदनीला मिठीत धरलेली

आठवते तुला ती पहीली भेट
भावनांनी कशी गर्दी केलेली
गर्दीत हरवताना कळलचं नव्हतं
रात्र कुठे अर्धी गेलेली

आठवते तुला ती पहीली भेट
दाटून आलेला चांदण्यांचा पहारा
अंतर दोघात होतं तरीही
चढत गेलेला देहाचा पारा

आठवते तुला ती पहीली भेट
किती हायसं वाटलेलं भावनांना
कवटाळलं होतं एकमेकांच्या
विचारांनी विचारांना

आठवते तुला ती पहीली भेट
मुक्या भावनांचं एक तळ साचलं होतं
दोघही तसे अज्ञानच होतो, तरीही
एकमेकांच अंतर्मन वाचलं होतं

हक्काचा खांदा

हल्ली काही बोलणे मी टाळत असतो

ओठांवरले शब्द नरड्य़ामधेच गाळत असतो

खरे आणि स्पष्ट बोलणे हा माझा गुन्हा आहे

त्याच त्याच वादात सापडलो मी पुन्हा आहे

लोकांवर प्रेम केले किती तरी ते "निरपेक्ष" आहे

हे न पटवून घेवुन नवे रंग दाखवतो .... प्रत्येक दोस्त ...जुना आहे !

मी माझे अश्रू गाळायला त्यांचा खांदा मागितला

त्यांनी माझ्या लोकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मलाच खांदा दिला !



कवी - उदय गंगाधर सप्रे - ठाणे - ०८ मे २००७

आता तु पुर्वीसारखी नव्हतीस

आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
मला पाहुन फ़ुलणारी, मला पाहुन हसणारी
एकान्तात माझी असणारी,
माझ्या खान्द्यावर डोक ठेवुन स्वत:ला विसरणारी

आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
भेटीसाठी हुरहुरणारी,
अवचितशा स्पर्शाने काहुरणारी,
साद न घालता वळुन पाहणारी,
विजेला घाबरुन माझ्या मिठित सामावणारी

पण,
दैवान म्हणाव की दुर्दैवान
तु त्या सन्ध्याकाळी आलिस
त्याच वाटेवरुन, त्याच काठावर
गळ्यातल्या मन्गळ्सुत्राशी चाळा करित म्हणालीस,
तु इथ एकटाच येतोस?

खर तर, तुझ्या त्या चार शब्दान्नी
आठवणीन्च्या खोल गर्तेत ओढुन घेतलेल
त्यातुन कसाबसा सावरुन मी एव्ढ्सच बोललो,

हो, मी इथ एकटाच येतो.
कारण हिच ति वाट तशीच जिवन्त आहे,
तोच नदिचा काठ अजुनही हिरवा आहे,
आणि त्यान्ना पाहुनका होइना
मला आणखी थोड जगावस वाटत म्हणुन

तु जायला निघालीस,
मी पुर्वीसारखी लडिवाळ साद मारली
पण, खरच तु पुर्वीसारखी नव्हतीस........

मैत्री ठरवून होत नाही

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....१
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....२
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....३
तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

अंदाज आरशाचा

अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा...

काठावरी उतरली, स्वप्ने, तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा...

ज़खमा कशा? सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने ,तो मोगरा असावा...

माथ्यावरी नभाचे ,ओझे सदा इलाही
दाही दिशा कशाच्या?हा पिंजरा असावा...

मी बरसलो आज शब्दांतुन

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

बोलकी फुले

बोलकी फुले
कधी कधी बागेत चालत असता
अनेक सुगंध दरवळती
अनेक रंग उधळती
जणू ती फुल काहीतरी सांगत असावी
चालत असतो मी त्या फुलांना पाहत
समोर येते ते पारीजातक
म्हणते मला माझ्या नाजूकपणावर नको जाऊस
ते पारिजातक असेच बोलता बोलता कोमेजून जाते
सुंदर सुंदर चाफा बोलती
मला जवळ घ्या
त्या चाफ्याने मन माझे सुगंधित होई
मग माझे मन मलाच म्हणे प्रीतीला जवळ करी तो चाफा
समोर येई ते गुलाब
त्या ठिकाणी मला अनेक गुलाबं दिसे
रंग अनेक पण साम्य एकच असे
ते फुल होते काट्यानी बहरलेले
हा गुलाब खूप काही सांगे
सफ़ेद गुलाब म्हणे मला जवळ घ्या
तुमच्या नाजूक मनात
माझा सुवास दरवळू दे
अन मैत्री अजून घट्टटट वाटू लागे गुलाबी गुलाब म्हणे
जा मला जाऊ द्या कोणाकडे
अन हळूच प्रीतीची भावना मनात जागवे
शेवटी उरला तो लाल गुलाब
तो हातात आला की सारखे सांगत असतो की
मला जवळ ठेवू नकोस
मी जितका कोमल नी सुंदर दिसतो
तेवढाच दु:ख ही देऊ शकतो
खरच असते की म्हणा
तोच की तो गुलाब जो प्रिती मैत्री अन शांतता दर्शवीत असतो
अन तोच का तो गुलाब जो आपल्या काट्यानी आपल्याला दु:ख देत असतो
तोच लाल गुलाब आपल्या काट्यांनी आपले जीवन काट्यमय करी
तोच तो गुलाब त्या प्रितीची आठवण मनात नेहमी जागवत असे

यात काही पाप नाही

यात काही पाप नाही
सिगरेटचा जेव्हा तुम्ही, मजेत घेता मस्त झुरका,
आवडलेल्या आमटीचा, आवाज करीत मारता भुरका,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
जबरदस्त डुलकी येते, धर्मग्रंथ वाचता वाचता,
लहान बाळासारखे तुम्ही, खुर्चीतच पेंगू लागता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
देवळापुढील रांग टाळून, तुम्ही वेगळी वाट धरता,
गरम कांदाभजी खाऊन, पोटोबाची पूजा करता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !
प्रेमाची हाक येते, तुम्ही धुंद साद देता,
कवितेच्या ओळी ऐकून, मनापासून दाद देता,
विश्वास ठेवा यात काही पाप नाही,
आनंदाने जगायचं नाकारणं, याच्यासारखा आणि दुसरा शाप नाही !

मुली असतात फुलासारख्या

 मुली असतात फुलासारख्या
 मुली लहान मुलासारख्या
 त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे
 त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे
 मुली म्हणजे relations
 मुली म्हणजे emotions
 छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्‍या
 शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्‍या
 मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला
 मुली म्हणजे मोर श्रावणातल्या
 मुली म्हणजे ठसून सौंदर्य
 मुली म्हणजे त्याग औंदर्य
 मुली असतात softcorner
 मुली असतात melting point
 घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point
 त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू
 पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू
 मुली वाटतात हव्याहव्याश्या
 मुली वाटतात आपल्याशा
 आमच मन समजून घेणार्‍या
 दुखात आम्हाला आधार देणार्‍या
 कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला
 काही नाव नसत पण तरही ते जपायच असत.....

रंग माझा वेगळा

जगत मी आलो असा (रंग माझा वेगळा)

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

रडली ती माय...

माय ही घराबाहेर गेली
तिच्या लेकराच्या उपाशी पोटासाठी
तिच लेकरु हे रडत होत
दिवसें दिवस थोड्याश्या अन्नासाठी...

पडताच बाहेर घराच्या ति गेली
लोकांच्या दारी दारी
कळलेच नाही जगं तिला
लोक ही हसली तिला वेळोवेळी...

फ़िरत राहीली ति दिवस दिवस
लेकराच्या उपाशी पोटासाठी
दिसली नाही नजर तिला साऱ्या लोकांची
तिच्या अंगावरल्या फ़ाटक्या साडीसाठी

फ़िरुनी आली परत घराकडे
गाव हिंडुनी सारा
लेकरु हे धावे तिच्या मागे मागे
तिचा पदर धरुनी काळा....

झटकुनी पदर परत माय
चालली सोडुनी लेकरासं
मागे वळुन पहाताचं
लेकरु हे हसुन बघती मायेस
माय ही रडुन बघती लेकरास...

(कल्पेश फोंडेकर)
१७-५-०७

कॉलेजची आठवण

बघता बघता वर्ष कसं गेल पटकन सरुन
गेल मात्र हळुच आठवणी जुन्या देवुन
म्हणता म्हणता आला हा शेवटचा दिवस,
खर सांगा, आठवलाना कॉलेजचा तो पहिला दिवस?
म्हटलं सुटलो परीक्षा एकदाची संपली
हट्‌ऽऽ यार मजेलाही ती सोबत घेवुन गेली.
कॉलेजच्या जवळचा तो डांबरी रस्ता,
अरे, पोट दुखायच तिथे हसता हसता.
कुणाची तरी नोट त्याच्याच खिशातुन डोकवायची
हळुच काढुन त्याच्या सकट सगळ्यांना ए१ पार्टी द्यायची.
फाईल कंप्लिशन्‌ला कुणाकडे तरी रात्र गाजवायची
येताना 'स्वदेस'ई स्टाईल मध्ये मग वरात निघायची.
लेक्चरला असताना हळुच सरांची खेचायची.
हांआ..मग परीक्षा आल्यावर आमचीच लागायची.
स्टाफरुम मधे जावुन त्यांची माफी मागायची
येतो सर. प्लीझ, कृपा करा तेवढी मार्क वाढवायची
कधी लेक्चर ला कुणाची चप्पल लपवायची
रडीला आल्यावर मग समोर आणुन ठेवायची.
नजरा चुकवत हळुच तिला बघायची
ति मात्र तिला अचुक हेरायची.
डेज्‌ मधे तिच्याशी फ्रेन्डशिप कारायाची
डीजे मधे मग जरा जवळीक व्हायची
हाय डिअर म्हणुन तिला हाक मारायची
हेलॊ ब्रदर म्हणुन आमचाच ती पोपट करायची.
म्हणुनच की काय आमच्या टीम मध्ये कोणी 'मंदिरा' नसायची
शेवटीला टिटवाळ्याच्या मंदिरात आमची पिक्‌निक निघायची.
येताना रिझल्ट लागल्याची बातमी समजायची
कॉलेज मधे येवुन मग यादी बघायची.
गणपतिबप्पाची कृपा व्हायची
आमची टिम फस्ट क्लास मधे जिंकायची.
अशी आमची ही कॉलेज लाईफ संपायची
अता फक्त 'तिची' आठवण काढायची.

असो,सांगता आहे ही एका गोड पर्वाची
सुरवात आहे ही नव्या आयुष्याची....

कधी काळी...

कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.

कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.

कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.

कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत.

संग्रहीत॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

एकदा मला मोकळ्या हवेत श्वास घ्यायचे आहेत...

आयुष्याचे ओझ उचलुन
पुर्णपणे थकलोय मी आता
थोडीशी विश्रांतीची गरज आहे मला
कोणी देईल का मला थोडीशी विश्रांती
बाजारात ह्या गोष्टी नाही विकत मिळत
नाही कधी मिळणार
नाहीतर कधीच शोधुन मी घेतली असती.
नाही कोणती मैत्री ही विश्रांती
देऊ शकते नाही कोणत नातं देऊ शकत.
आयुष्याचे हे ओझे नकोसे वाटते आता मला
रान रान भटकलो त्या आयुष्याच्या
शोधात पणं आयुष्य हे कुठेच नाही सापडलं.
किती जखमा झाल्या ह्या शरीराला
किती किती यातना सोसाव्या लागल्या
मायेच्या जाळ्यात गुंतुन आपल्यांनाच सोडाव लागलं
ह्या आयुष्यानेच दिल्या साऱ्या यातना
जेव्हा कधी विचार केला आयुष्याचा
तेंव्हा त्याने ते अश्रु सारे भेट म्हणुन दिले.
आता कुणाचा हात पकडेल हे आयुष्यं
कोणता आसरा आहे ह्या एकट्या जिवाला
हे जगणं बहुदा माझ शेवटचचं
अस वाटतं कि एका क्षणीच
सारे आयुष्य संपउन मोकळ्या हवेत
जाउन थोडेसे श्वास घ्यावे.

(कल्पेश फोंडेकर)
१३-५-०५

आज मी प्रेमात आहे.

जग सारे झाले गुलाबी
आज मी प्रेमात आहे.
नच दिसे कोठे खराबी
आज मी प्रेमात आहे.

पेटी वाहणारी कचर्याची,
भासे मज कुंडी फुलांची.
रस्ता खड्डयात हरवलेला,
चंद्र मज हा भासताहे.
आज मी प्रेमात आहे.

थुंकणारी ही जी जनता,
वाटते मज पुज्य देवता.
उकिरड्यावरचे ते डुक्कर,
जणू गोंडस ससाच आहे.
आज मी प्रेमात आहे

धुर वहानांचा हा जो दाटे,
धुकेच मजला तेचि वाटे.
पोलिसमामा चौकामधला,
योग्यासमान दिसतो आहे.
आज मी प्रेमात आहे.

वहानाचा मज लागे धक्का,
साँरी'म्हणुनि हसलो बरका!
माझ्या सगळ्या शत्रुंनाही,
आज सलाम करतो आहे.
आज मी प्रेमात आहे

एकदा तरी...

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचीत सोनेरी उन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येते

शोधून कधीच सापडत नाही
मागून कधीच मीलत नाही
वादळ वेडे घुस्ते तेव्हा
टाळू म्हणून टलत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या वीजलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

प्रेमाच्या सफल वीफळ्तेला
खरतर काहीच महत्व नसत
इथल्या जय पराज्यात
एकाच गहीर्े सार्थक अस्त

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारे मन लागते
खुल्या सोनेरी उनासारखे
आयुष्यात एकदातरी प्रेम यावे लागते

नक्षत्रांचे प्रेम...

नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र नीवडलेला असतो
कारण प्रत्येकजण कधी ना कधी एकदातरी प्रेमात पडलेला असतो

तिच्या चेहरयाला चंद्र म्हणायची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तीने कीतीही डोळा चुकवला तरी
त्याने हार मानलेली नसते
तीच्या सौंदर्याचे कौतुक करण्याचा जणू छंदच त्याला जडलेला असतो
कारण प्रत्येकजण कधी ना कधी एकदातरी प्रेमात पडलेला असतो

पान वाल्याकडे त्याची
अगदी चांगलीच उधारी असते
तरी, तीच्यसाठी चंद्र-तारे आणायची
त्याची एका पायावर तयारी असते.
तीच्यसाठी काहीही करण्याचा नीर्धार, त्याच्या मनात खोलवर दडलेला असतो
कारण नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र नीवडलेला असतो

तीच्यसाठी गुलाब तोडतना तो
काटे लागतील ह्याची तमा बाळगत नाही
आणी ती सोबत असे पर्यंत
त्याला दुख: कधीच उमगत नाही
तीच्या क्षणभर दूराव्यानेही, तो दुख:सागारात बुडालेला असतो
कारण नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र नीवडलेला असतो

बर यालाच प्रेम म्हणाव तर,
लोक नीर्मल प्रेमाची भाषा करतात
आणी आताच प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून
अगदी शुध प्रेमाची आशा करतात
अशाच लोकांमुळे प्रत्येकजण प्रेमात थोडा र्खडलेला असतो
तरीदेखील प्रत्येकजण केव्हा ना केव्हा एकदातरी प्रेमात पडलेला असतो
एकदातरी प्रेमात पडलेला असतो..........................

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल !!

पुरे झाले सुर्य चंद्र, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदीनाले, पुरे झाला वारा

जाळासारखा नजरेमध्ये नजर बांधून पहा,

सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?

डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,

जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत

नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

शेवाळलेले शब्द अन यमक छंद करतील काय?


म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापुर्वी वेळ,

प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं,

प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमध्ये उगवून सुध्दा आभाळात पोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस,

बुरुजावरती झेंड्या सारखा फडकू नकोस

उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं,

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेल!


-कुसूमाग्रज.