बघता बघता वर्ष कसं गेल पटकन सरुन
गेल मात्र हळुच आठवणी जुन्या देवुन
म्हणता म्हणता आला हा शेवटचा दिवस,
खर सांगा, आठवलाना कॉलेजचा तो पहिला दिवस?
म्हटलं सुटलो परीक्षा एकदाची संपली
हट्ऽऽ यार मजेलाही ती सोबत घेवुन गेली.
कॉलेजच्या जवळचा तो डांबरी रस्ता,
अरे, पोट दुखायच तिथे हसता हसता.
कुणाची तरी नोट त्याच्याच खिशातुन डोकवायची
हळुच काढुन त्याच्या सकट सगळ्यांना ए१ पार्टी द्यायची.
फाईल कंप्लिशन्ला कुणाकडे तरी रात्र गाजवायची
येताना 'स्वदेस'ई स्टाईल मध्ये मग वरात निघायची.
लेक्चरला असताना हळुच सरांची खेचायची.
हांआ..मग परीक्षा आल्यावर आमचीच लागायची.
स्टाफरुम मधे जावुन त्यांची माफी मागायची
येतो सर. प्लीझ, कृपा करा तेवढी मार्क वाढवायची
कधी लेक्चर ला कुणाची चप्पल लपवायची
रडीला आल्यावर मग समोर आणुन ठेवायची.
नजरा चुकवत हळुच तिला बघायची
ति मात्र तिला अचुक हेरायची.
डेज् मधे तिच्याशी फ्रेन्डशिप कारायाची
डीजे मधे मग जरा जवळीक व्हायची
हाय डिअर म्हणुन तिला हाक मारायची
हेलॊ ब्रदर म्हणुन आमचाच ती पोपट करायची.
म्हणुनच की काय आमच्या टीम मध्ये कोणी 'मंदिरा' नसायची
शेवटीला टिटवाळ्याच्या मंदिरात आमची पिक्निक निघायची.
येताना रिझल्ट लागल्याची बातमी समजायची
कॉलेज मधे येवुन मग यादी बघायची.
गणपतिबप्पाची कृपा व्हायची
आमची टिम फस्ट क्लास मधे जिंकायची.
अशी आमची ही कॉलेज लाईफ संपायची
अता फक्त 'तिची' आठवण काढायची.
असो,सांगता आहे ही एका गोड पर्वाची
सुरवात आहे ही नव्या आयुष्याची....
Thursday, May 17, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment