Thursday, May 17, 2007

एकदा मला मोकळ्या हवेत श्वास घ्यायचे आहेत...

आयुष्याचे ओझ उचलुन
पुर्णपणे थकलोय मी आता
थोडीशी विश्रांतीची गरज आहे मला
कोणी देईल का मला थोडीशी विश्रांती
बाजारात ह्या गोष्टी नाही विकत मिळत
नाही कधी मिळणार
नाहीतर कधीच शोधुन मी घेतली असती.
नाही कोणती मैत्री ही विश्रांती
देऊ शकते नाही कोणत नातं देऊ शकत.
आयुष्याचे हे ओझे नकोसे वाटते आता मला
रान रान भटकलो त्या आयुष्याच्या
शोधात पणं आयुष्य हे कुठेच नाही सापडलं.
किती जखमा झाल्या ह्या शरीराला
किती किती यातना सोसाव्या लागल्या
मायेच्या जाळ्यात गुंतुन आपल्यांनाच सोडाव लागलं
ह्या आयुष्यानेच दिल्या साऱ्या यातना
जेव्हा कधी विचार केला आयुष्याचा
तेंव्हा त्याने ते अश्रु सारे भेट म्हणुन दिले.
आता कुणाचा हात पकडेल हे आयुष्यं
कोणता आसरा आहे ह्या एकट्या जिवाला
हे जगणं बहुदा माझ शेवटचचं
अस वाटतं कि एका क्षणीच
सारे आयुष्य संपउन मोकळ्या हवेत
जाउन थोडेसे श्वास घ्यावे.

(कल्पेश फोंडेकर)
१३-५-०५

No comments: