आठवते तुला ती पहीली भेट
माझ्या सारखंचं तुझंही झालं होतं
नेमकं काय बोलायचं
एक अनामिक ओझंही आलं होतं
आठवते तुला ती पहीली भेट
तुझ्या डोळ्यात रहस्य दडलेलं
सात जन्माचं नातं
मी पहील्या नजरेतचं अनूभवलेलं
आठवते तुला ती पहीली भेट
किती गोडवा दाटलेला
दिवस तो अमेचा होता
तरी पाडवा वाटलेला
आठवते तुला ती पहीली भेट
भावनांच्या चांदण्याने भरलेली
एका चंद्राने अलगद एका
चांदनीला मिठीत धरलेली
आठवते तुला ती पहीली भेट
भावनांनी कशी गर्दी केलेली
गर्दीत हरवताना कळलचं नव्हतं
रात्र कुठे अर्धी गेलेली
आठवते तुला ती पहीली भेट
दाटून आलेला चांदण्यांचा पहारा
अंतर दोघात होतं तरीही
चढत गेलेला देहाचा पारा
आठवते तुला ती पहीली भेट
किती हायसं वाटलेलं भावनांना
कवटाळलं होतं एकमेकांच्या
विचारांनी विचारांना
आठवते तुला ती पहीली भेट
मुक्या भावनांचं एक तळ साचलं होतं
दोघही तसे अज्ञानच होतो, तरीही
एकमेकांच अंतर्मन वाचलं होतं
Thursday, May 17, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment