आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
मला पाहुन फ़ुलणारी, मला पाहुन हसणारी
एकान्तात माझी असणारी,
माझ्या खान्द्यावर डोक ठेवुन स्वत:ला विसरणारी
आता तु पुर्वीसारखी नव्हतीस
भेटीसाठी हुरहुरणारी,
अवचितशा स्पर्शाने काहुरणारी,
साद न घालता वळुन पाहणारी,
विजेला घाबरुन माझ्या मिठित सामावणारी
पण,
दैवान म्हणाव की दुर्दैवान
तु त्या सन्ध्याकाळी आलिस
त्याच वाटेवरुन, त्याच काठावर
गळ्यातल्या मन्गळ्सुत्राशी चाळा करित म्हणालीस,
तु इथ एकटाच येतोस?
खर तर, तुझ्या त्या चार शब्दान्नी
आठवणीन्च्या खोल गर्तेत ओढुन घेतलेल
त्यातुन कसाबसा सावरुन मी एव्ढ्सच बोललो,
हो, मी इथ एकटाच येतो.
कारण हिच ति वाट तशीच जिवन्त आहे,
तोच नदिचा काठ अजुनही हिरवा आहे,
आणि त्यान्ना पाहुनका होइना
मला आणखी थोड जगावस वाटत म्हणुन
तु जायला निघालीस,
मी पुर्वीसारखी लडिवाळ साद मारली
पण, खरच तु पुर्वीसारखी नव्हतीस........
Thursday, May 17, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment