Tuesday, July 10, 2007

योगा योग

योगा-योगही किती सुंदर असतात,
जसे दवबिंदू हिरव्यागार पानावर स्थिरावतात,
या योगा-योगांचे महत्व तरी पहा,
अनोळखी ही अगदी आपलेसे होतात...

एखादी घटना छानपैकी जुळुन येते,
योगा-योग यालाच तर म्हटले जाते,
या जुळलेल्या घटनाही किती सुखद असतात,
क्वचित अनमोल असा ठेवाही देऊन जातात....

प्रत्येक नाण्याला दुसरी बाजु असते,
योगाची कथाही वेगळी नसते,
योगा-योगालाही दुर्दैवाची किनार असते,
क्वचित सर्वस्वाचीही धुळधाण करते....

योगा-योगालही काही चवी असतात,
सहा रसांची याला देणगी असते ,
यांची चव घेता घेता माणुस शहाणा होतो,
योगा-योग योगा-योगानेच होतो हे समजतो...

No comments: