Wednesday, July 25, 2007

निर्णय

@मोनिका घरत.
मनात होते कधी एकदा
तुझ्यासवे वाळूत फिरावे
विसरूनी या सार्‍या जगताला
प्रेमगीत हे मिळुनी गावे

आयुष्याच्या एका संध्याकाळी
एक आठवण मनात सलते
अधुरे राहीले स्वप्न माझे
जुळले नाही अपुले नाते

विनंती एकच विसरूनी जा हे
तुझ्या परीने उणी आहे मी
सुखी रहा तू सार्‍या जन्मी
तव मार्गातुन दूर उभी मी

No comments: