एखादा तरंग उठावा
आणि उलथा-पालथ होऊन
सगळ शांत निश्चल व्हाव तसच काहितरी हे
तिच आणि त्याच भांडण झालेल
चांगलच जोरदार
तिच माहेर आणि सासर
दोघांचाही उध्दार होण्याइतपत
आणि आता सर्वत्र
अबोल्याच राज्य...
सकाळ व्हावी
तिही भांडी आपटण्याच्या आवाजाने
त्यानेही द्यावे उत्तर
मग आपटण्याऱ्या दरवाज्याने...
नाश्ता व्हावा
पण अळणी लागावा
आणि चहा मात्र कपातच रहावा
दुपार तर झालीये
पण आज तो इकडे एकटाच
आणि तिही तिकडे
मागुन थोडीशी कुजबुज
आणि मन चाहुल घेण्यात दंग...
समोरच्या होटेलातली
नेहमीची जागा आज कोणीतरी
दुसऱ्याच जोडीने बळकावलेली
आणि मनात आठवणींनी
उडवलेली गर्दी
तिकडे तो
आणि इकडे ती....
कस बस काम उरकुन
दोघही घरी निघालेले
आताशा राग जरा गेलेला...
त्याने मग नाईट शो
बुक केलेला..
तिनेही पूल साईड टेबल
रीझर्व्हड केलेला..
कालच भांडण आताशा
हरवलेल...पण
त्याने येउन मनवाव
म्हणुन तिच मन रुसलेल...नाटकीच
त्याने येउन सांगावा बेत
अन तिने तिचा...
जुनच भांडण पुन्हा नव्याने सुरु व्हाव...
भांडता भांडता त्याने म्हणाव
रागवलीस ना की खुपच सुंदर दिसतेस
तिनेही मग लाजुन त्याच्या मिठीत शिराव
अन मग रात्रभर त्यांनी
चांदण्याच्याच संगतीत घालवावी...रुपेरी चांदणे मिठीत भरत ....
No comments:
Post a Comment