Friday, July 13, 2007

"संधी" म्हणजे सकाळची "मुंबई लोकल"

-सचिन काकडे [जुलै १३,२००७]
संधी म्हणजे सकाळची "मुंबई लोकल"
हीला नेहमी सुटण्याआधीच पकडायचंय
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
तीला वेळेवर पकडायचंय
का तीच्यामागे धावत तिला पकडायचय


ध्येयाकडे जायला दिल्या नियतीने दोन लोकल
एक 'फ़ास्ट' लोकल तर दुसरी 'स्लो' लोकल
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
'फ़ास्ट' लोकलने निराशेचे स्टेशन चुकवायचय
की स्लोने प्रत्येक स्टेशन वर थांबायचय


एक गेली तर दुसरी ही नक्कीच येणार पण
ती येईपर्यंत वाट ही पाहावी लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
हवं तिथे वेळेवर पोहोचायचय
की उशीरा पोहोचायचय


ही लोकल वेळेवर पकडलीत तर
आरामात खिडकीपाशी हवेशीर जागा मिळणार
हीला पकडायला उशीर केला तर
दरवाजावरच लटकावे लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
खिडकीपाशी आरामात हवा खात बसायचय की
बळजबरीने दरवाज्यावर लटकायचाय


या लोकलने प्रवास करताना
तुम्हाला कोणाच जागा नाही देणार
गर्दीतुन जागा स्वत:ची तुम्हालाच करावी लागणार
एखाद्या पुढच्या माणसाला डावलुनच पुढे जाव लागणार
ध्येयाकडे कसं पोहोचायचय
हे तुमचं तुम्हांलाच ठरवायचंय
एखाद्याच्या आधाराने त्याच्या पायावर उभं राहायचय
की थोडी मेहनत करुन स्वत:च्या पायावर उभं रहायचय


मग आता

तुम्हीच ठरवा तुम्हाला जीवनाचे ध्येय कसं गाठायचंय
हवं त्या ठीकाणी कुठल्या लोकलने पोहोचायचं........................

No comments: