धागा द्या धागा द्या (धागा = THREAD, -- इति ओर्कुत)
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या
धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं
येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या (चढा-ओढ - माझाही वाटा मोठा आहे)
जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू द्या
ऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या
मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या
निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या
दान द्या, भिक्षा द्या
प्रतिसाद आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या कवितेना
जगवण्यासाठी एक श्वास द्या
No comments:
Post a Comment